शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट बुकींगला प्रवाशांची वाढती पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:53 IST

मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे.

ठळक मुद्देपुणे विभागात दि. ६ मार्चपर्यंत ३ लाख ७५ हजार ५८६ प्रवाशांना या सेवेचा केला वापर प्रवासादरम्यान अ‍ॅपमधील शो टिकीट ऑप्शन मधील तिकीट दाखविणे आवश्यक

पुणे : मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट बुकींग करण्यासाठी प्रवाशांची पसंती वाढू लागली आहे. मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे.मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी युटीएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. अनारक्षित तिकीटासाठी बहुतेक स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे अनेकदा तिकीट वेळेत न मिळाल्याने प्रवाशांना गाडी मिळण्यात अडचणी येतात. यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे कुठेही जाण्यासाठी अनारक्षित तिकीट काढता येते. दि. ४ एप्रिल २०१८ पासून पुणे विभागातील उपनगरीय स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर रोजी सर्व स्थानकांसाठी ही सुविधा खुली केली केली. रेल्वे स्थानक इमारत किंवा रेल्वेमागार्पासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मोबाईलवर अ‍ॅपद्वारे तिकीट काढता येते. पुणे विभागात दि. ६ मार्च पर्यंत ३ लाख ७५ हजार ५८६ प्रवाशांना या सेवेचा वापर केला आहे.त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. दरम्यान, युटीएस हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. अ‍ॅपमधील आर वॉलेट रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर तिकीट घेता येते. आर वॉलेटद्वारे तिकीटावर पाच टक्क्यांची सुटही दिली जात आहे. प्रवासादरम्यान अ‍ॅपमधील शो टिकीट ऑप्शन मधील तिकीट दाखविणे आवश्यक आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.-------

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणonlineऑनलाइनticketतिकिटpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स