शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:21 IST

मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठविणार प्रस्ताव, आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे.

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्याचा विचार सुरू झाला आहे. या बाबतचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सरकारची नोकरभरती थांबलेली आहे. कारण, तेथील बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आलेली नाही. 

आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपातात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जावे, त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करावे, अशी आदिवासी समाजाची मागणी आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ही बैठक झाली. 

बैठकीला मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अशोक उईके, अतुल सावे आदी उपस्थित होते. भुसे आणि भुजबळ यांनी आदिवासी समाजास अतिरिक्त आरक्षण देताना एसईबीसी, ईडब्लूएस, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, अशा सूचना केल्या. 

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आदिवासीबहुल जिल्ह्यांत लोकसंख्येच्या अनुपातात आदिवासींना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास आहे. तशी संवैधानिक तरतूद देखील आहे, ती अंमलात आणावी, अशी मागणी आहे. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले की, या आठ जिल्ह्यांमध्ये बहुजन समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. अशावेळी आदिवासींना वाढीव आरक्षण द्यायचे, म्हणून आदिवासींना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिले आहे.

टॅग्स :reservationआरक्षणjobनोकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार