विदर्भात तापमानामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:28 IST2015-08-25T02:28:07+5:302015-08-25T02:28:07+5:30

राज्यात दुसऱ्यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके

Increase in temperature in Vidarbha | विदर्भात तापमानामध्ये वाढ

विदर्भात तापमानामध्ये वाढ

अकोला : राज्यात दुसऱ्यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास फळधारणेवर आलेली पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर, म्हणजेच १ कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; पण जून महिन्याच्या पावसानंतर दीड महिना दडी मारल्याने पिकांना अगोदरच फटका बसला होता. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस आला, त्यानंतर पुन्हा २० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळाचे सावट कायम आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नव्हते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असून, या तापमानाने पुन्हा जमीन भेगाळली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील स्थितीही गंभीर आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात आतापर्यंत ५०८. ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी असला तरी हा पाऊस केवळ चार दिवस पडला.

राज्यात पुन्हा पावसाने दडी मारली असून, पिकांना त्याची झळ बसताना दिसत आहे. राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. आता केवळ पावसाची प्रतीक्षा आहे.
अनिल बनसोड, कृषी सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे.

Web Title: Increase in temperature in Vidarbha