शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या व्याप्तीत वाढ

By admin | Updated: June 21, 2017 03:08 IST

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राबविली जाते. या योजनेचा लाथ मिळविण्यासाठी खालील अटी टाकण्यात आल्या आहेत

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, कृषी व संलग्न पदवी या अभ्यासक्रमाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. न्यायालयीन लढाईमध्ये आरक्षण अडलेल्या मराठा समाजाला या निर्णयाचा मुख्यत्वे फायदा होणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी निश्चित केलेल्या निवडक अभ्यासक्रमांच्या यादीत कृषी व संलग्न विषयाच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी दहावी अथवा बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याची अट शिथिल करण्यात आली. या प्रवर्गातील काही पदविकाधारक विद्यार्थी निवडक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या परीक्षेत ६० टक्के गुणांच्या अटींऐवजी संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक करण्यात आले आहेत. तसेच पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये निवासाची व्यवस्था न झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राबविली जाते. या योजनेचा लाथ मिळविण्यासाठी खालील अटी टाकण्यात आल्या आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांस महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये वर्गात उपस्थित राहणे आवश्यक. तसेच प्रत्येक सत्रातील अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक.

लाभार्थी विद्यार्थ्याने एखाद्या सत्राची (सेमिस्टरची) परीक्षा दिली नसल्यास अथवा अनुत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षासाठी असा विद्यार्थी या योजनेच्या लाभास अपात्र.

पुन्हा त्या सत्रात अथवा वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा अंशत: पास झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास योजनेचा लाभ मिळणार.लाभार्थी विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पूर्णत: अनुत्तीर्ण झाल्यास या योजनेंतर्गत कायमस्वरूपी अपात्र.या योजनेच्या लाभासाठी आधारसंलग्नित बायोमॅट्रीक उपस्थिती प्रणालीमध्ये किमान ५० टक्के शैक्षणिक उपस्थिती आवश्यक असेल.