क्रिकेट सामान्यांसाठीच्या बंदोबस्त शुल्कात वाढ

By Admin | Updated: June 29, 2017 02:09 IST2017-06-29T02:09:18+5:302017-06-29T02:09:18+5:30

मुंबई आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये क्रिकेट सामन्यांसाठीचे बंदोबस्त शुल्क आज गृह विभागाने नव्याने निश्चित केले. मुंबई आणि अन्य ठिकाणांसाठी वेगवेगळे दर असतील.

Increase in settlement charges for cricketers | क्रिकेट सामान्यांसाठीच्या बंदोबस्त शुल्कात वाढ

क्रिकेट सामान्यांसाठीच्या बंदोबस्त शुल्कात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये क्रिकेट सामन्यांसाठीचे बंदोबस्त शुल्क आज गृह विभागाने नव्याने निश्चित केले. मुंबई आणि अन्य ठिकाणांसाठी वेगवेगळे दर असतील.
मुंबईत टी-२० सामन्यासाठीचे शुल्क ६६ लाख रुपये, एक दिवसीय सामन्याचे शुल्क ६६ लाख रुपये तर कसोटी सामन्यासाठी ५५ लाख रुपये असेल. नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथे होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी हे शुल्क ४४ लाख रुपये, एक दिवसीय सामन्यासाठी ४४ लाख, कसोटीसाठी ३८ लाख ५० हजार असेल. सामन्यांच्या आयोजनाबाबत आलेल्या धमक्यांचा विचार करून अतिरिक्त बंदोबस्तासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हे शुल्क हे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीतील सामन्यांसाठी असेल.

Web Title: Increase in settlement charges for cricketers