देशासह महाराष्ट्राचाही लौकिक वाढवा
By Admin | Updated: August 2, 2016 04:21 IST2016-08-02T04:21:48+5:302016-08-02T04:21:48+5:30
आॅलिंपिकसारख्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

देशासह महाराष्ट्राचाही लौकिक वाढवा
मुंबई : आॅलिंपिकसारख्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून देशासोबतच महाराष्ट्राचाही लौकिक वाढवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
५ आॅगस्टपासून क्रीडा जगताच्या कुंभमेळ््याला अर्थात रिओ आॅलिंपिकला सुरुवात होईल. रिओसाठी महाराष्ट्रातील ललिता बाबर व कविता राऊत (अॅथलेटिक्स), आयोनिका पॉल (नेमबाजी), देवेंद्र वाल्मिकी (हॉकी), दत्तू भोकनळ (नौकानयन) आणि प्रार्थना ठोंबरे (टेनिस) हे खेळाडू आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, नॅशनल अँटी डोपींग असोसिएशनने (नाडा) कुस्तीपटू नरसिंग यादव याला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषमुक्त केले, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)