शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

Municipal Corporations : मनपा व नगर परिषदेत नगरसेवक संख्येत वाढ, मुंबईत मात्र कायम; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 07:18 IST

Municipal Corporations : महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल.

मुंबई : राज्यातील २६ महापालिका आणि सर्व नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महापालिकेत मात्र सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या कायम असेल.

राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या महापालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ आहे. तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे.

किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्यादेखील वाढेल. २०२१ची जनगणना कोरोनामुळे होऊ शकलेली नाही. त्यामुळे लोकसंख्येतील अपेक्षित वाढ गृहीत धरून नगरसेवक संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. बहुतेक महापालिकांमधील नगरसेवक संख्या ११ने वाढली. सरासरी १७ टक्के वाढ करण्यात आली असली तरी ही वाढ सरसकट नाही. विशेषत: नागपुरात केवळ पाचच नगरसेवक वाढले.

महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल. सहा लाखांपेक्षा अधिक व  १२ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व कमाल संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल.

१२ लाखांपेक्षा अधिक व १४ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व कमाल संख्या १५६ पेक्षा अधिक नसेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व कमाल संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या 

पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व कमाल संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल. नगर पंचायतींमधील सध्याची नगरसेवक संख्या कायम राहील.

नगर परिषदांमध्ये राहील असे चित्रअ वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व कमाल संख्या ७५ हून अधिक नसेल. ब वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व कमाल संख्या ३७ हून अधिक नसेल. क वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.

महापालिका      नगरसेवक     सुधारीत                          संख्या              संख्या पुणे     १६२     १७३नागपूर     १५१     १५६औरंगाबाद     ११५     १२६ठाणे     १३१     १४२पिंपरी-चिंचवड     १२८     १३९नाशिक     १२२     १३३कल्याण-डोंबिवली     १२२     १३३नवी मुंबई     १११     १२२वसई-विरार     ११५     १२६अमरावती     ८७     ९८परभणी     ६५     ७६चंद्रपूर     ६६     ७७अहमदनगर     ६८    ७९लातूर     ७०     ८१धुळे     ७४     ८५जळगाव     ७५    ८६उल्हासनगर     ७८    ८९पनवेल     ७८    ८९अकोला     ८०    ९१कोल्हापूर     ८१    ९२नांदेड-वाघाळा     ८१     ९२मालेगाव     ८४    ९५भिवंडी-निजामपूर     ९०     १०१मिरा-भाईंदर     ९५     १०६सोलापूर     १०२    ११३सांगली-मिरज     ७८     ८९

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMaharashtraमहाराष्ट्र