शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या जागांमध्ये वाढ; ७ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 05:58 IST

आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत आॅनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा या जागांमध्ये सात हजार १४० जागांची वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश https://admission.dvet.gov या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्धअसून प्रवेशासाठी एकूण १ लाख ४५ हजार ५३२ जागा आहेत.

आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू करत असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.राज्यात ३५८ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. तसेच राज्यात ५६९ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे.

शासकीय आणि खासगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ५३२ विद्यार्थी आहे. नव्याने आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर काळात मुदत दिली जाईल आणि २१ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.तसेच जिल्हानिहाय समुपदेशन फेऱ्या २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडणार असून खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेश १६ आॅगस्टपासून पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक (सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत)च्आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे - १ आॅगस्ट ते १४ आॅगस्टच्पहिल्या फेरीसाठी संस्थानिहाय प्राधान्य सादर करण्यासाठी नोंदणी करून लॉगइन आयडी व पासवर्ड सादर करणे - २ आॅगस्ट ते १४ आॅगस्टच्प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे - १६ आॅगस्ट (सकाळी ११ वाजता)च्गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि माहितीत बदल करणे - १६ आणि १७ आॅगस्टच्अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - १८ आॅगस्ट (सायं. ५ वाजता)विभागनिहाय प्रवेश क्षमताविभाग सरकारी आयटीआय खाजगी आयटीआय एकूणआयटीआय प्रवेश आयटीआय प्रवेश आयटीआय प्रवेशसंख्या क्षमता संख्या क्षमता संख्या क्षमतामुंबई ६७ १६०७६ ३९ ३८७२ १०६ १९९४८

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज