IT Raid on Abu Azmi: अबू आझमींवर आयकर विभागाचे छापे; २० ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:13 IST2022-11-15T14:12:50+5:302022-11-15T14:13:21+5:30
IT Raid on Abu Azmi: व्यवसायांमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला असून काही महिन्यांपूर्वीपासून आयकर विभागाची नजर होती.

IT Raid on Abu Azmi: अबू आझमींवर आयकर विभागाचे छापे; २० ठिकाणी कारवाई
समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्दचे आमदार अबू आझमी यांच्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील २० हून अधिक ठिकाण्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.
व्यवसायांमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला असून काही महिन्यांपूर्वीपासून आयकर विभागाची नजर होती. मुंबईसह राज्यभरात, लखनऊसह उत्तर प्रदेशमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये आमझी यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश असल्याचे समजते.
दरम्यान, अबु आझमी अमरावती, अकोल्याच्या दौऱ्यावर होते. तेथील सर्व कार्यक्रम रद्द करून ते सकाळी मुंबईला पोहोचले आहेत. मला याबाबत काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी दिली आहे.