शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 07:47 IST

Mahavikas Aghadi: वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले आहे. वंचितला आघाडीत सामील करून घेण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आधीच सकारात्मक होते, मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसकडूनही याला संमती मिळाल्यानंतर याविषयीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांबरोबरच वंचित आघाडीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

आघाडीत सामील होणारवंचितच्या प्रदेश उपाध्यक्षांना बैठकीत योग्य सन्मान मिळाला नाही. त्याचप्रमाणे आघाडीत सामील करून घेण्याबाबतच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नाना पटोले यांना आहेत का? याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून पत्र दिलेले नाही, तरीही भाजपचा पराभव हीच आमची प्राथमिकता असल्याने मविआत सामील होऊ.- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार  वंचितच्या समावेशामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे. येत्या २ फेब्रुवारीला आघाडीची बैठक होणार असून या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहे. वंचितसह सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्षांचा आघाडीत समावेश झाला आहे.   - संजय राऊत, शिवसेना नेते

- वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हेही या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मध्येच बैठकीतून बाहेर काढल्याचा दावा पुंडकर यांनी केला. वंचितचा अजेंडा आपणच सर्वांसमोर ठेवला. मात्र, त्यानंतर आपल्याला १ तास बाहेर ठेवण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. nखा. संजय राऊत यांनी मात्र याचा इन्कार केला. बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे तीन प्रतिनिधी सहभागी झाले होते. या तीनही प्रतिनिधींनी आमच्यासोबत चर्चा केली, शिवाय एकत्र भोजनही घेतले. त्यामुळे अपमानास्पद वागणूक दिल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे राऊत म्हणाले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर