शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

राज्यात दररोज तीन ठिकाणी पोलिसांना मारहाणीच्या घटना; आतापर्यंत ८१२ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 04:32 IST

कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत.

मुंबई : राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांशी मारहाण करणे, त्यांना हुज्जत घालण्याच्या घटना वाढत राहिल्या आहेत. रोज सरासरी दोन ते तीन गुन्हे दाखल होत असून या हल्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ८१२ जणांना अटक करण्यात आली आहे. तर काहीजण फरारी आहेत.कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत. मात्र काही समाजकटंक व माथेफिरू नागरिक जमावबंदीचा आदेश डावलून नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करीत आहेत. पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याशी हुज्जत घालणे, नाकाबंदीत अंगावर गाडी घालणे, मारहाण करण्याचे प्रकार करीत आहेत. २२ मार्चपासून १६ मे पर्यत राज्यात अशा तब्बल २३६ घटना घडल्या आहेत, म्हणजेच रोज सरासरी दोन ते तीन प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाºयाला मारहाण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ८१२ जणांना अटक केली आहे. तर काही हल्लेखोर फरारी आहेत. त्याचा शोध सुरु आहे. तर लॉकडाउनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .या काळात अवैध वाहतूक करणाºया १३०५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८,५६८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. राज्यात एकूण ३८८४ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३,७१,३१० लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोविड संदर्भात एक लाख ९ हजार गुन्हेलॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यभरात आतापर्यंत कोविड संदर्भातील एक लाख ९ हजार ३९४ गुन्हे दाखल झाले आहेत. जमावबंदी आदेश मोडणे, अवैध वाहतूक आणि पोलिसांना मारहाणप्रकरणी हे गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी २०,६२६ व्यक्तींना अटक केली आहे. तर चार कोटी ३६ लाख ७४ हजार ८९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या काळात पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ९३ हजार फोन आले. तर अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,६८,९७१ पास देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस