शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

केंद्र सरकार देणार तृणधान्याला प्रोत्साहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:36 IST

अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित

पुणे : केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. या अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात होत आहे. गणेश खिंड रस्त्यावरील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को आॅपरेटीव्ह मॅनेजमेंट (वॅमनिकॉम) या संस्थेत हा कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि महाराष्ट्राच्या कृषि विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने १३ एप्रिल २०१८ला ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांचे उत्पादन, वापर आणि व्यापार वाढावा यासाठी त्यांना पौष्टिक अन्नधान्य (न्यूट्री-सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य पिके घेणारी आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडु, तेलंगना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये देखील यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात न्यूट्री-सिरीअल पिकांची विविधता, लागवड, उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावरील संकल्पना मांडण्यात येतील. तसेच त्यावरील प्रदर्शनही आयोजित केले जात आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी उत्पादक कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन व विकास संस्था यासारखे विविध भागधारकही यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारीस प्रोत्साहन दिले जाईल. ............

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती