शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

समृद्धी महामार्गाचे 23 जानेवारीला लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:31 IST

समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना निघाली होती. 

विजय सरवदे  लोकमत न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : नागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद हा समृद्धी महामार्ग २३ जानेवारी रोजी, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी हा महामार्ग सुरू होईल.काँक्रीटच्या या मार्गाचे औरंगाबाद जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हर्सूलच्या पूर्वेस पोखरी शिवारात या रस्त्यावरील बोगद्याचेही काम पूर्ण झाले आहे. 

जिल्ह्यात चार इंटरचेंजेसची कामे पूर्ण झाली आहेत. सावंगी येथील इंटरचेंजच्या ठिकाणी अंडरपासचे (औरंगाबाद-सिल्लोड मार्ग) कामही सुरू आहे. सध्या पांढरे पट्टे मारणे, चिन्हांचे फलक, टोल प्लाझाच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिस्टम, संरक्षक भिंती, पुलांची रंगरंगोटी ही कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत ५२० किलोमीटरपैकी ४८० किलोमीटर लांबीचा मार्ग तयार आहे. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी पूल व उरलेल्या ४० किलोमीटरचे काम सुरू आहे. तिथे वाहनांना वळण दिले जाईल.    

 वेगमर्यादा १२० किमी या महामार्गावर कमाल १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालविता येईल; परंतु सध्या शासकीय नियमानुसार १२० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा राहील, असे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

nसमृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना निघाली होती. nहा महामार्ग भारतातील पहिला शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग. nनागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून महामार्ग जातो.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग