शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:05 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप लढणार असलेल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना आमदारकीसाठी कोण उमेदवार हवा आहे याचे तीन पसंतीक्रम घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महायुतीतील तीन पक्षांचा विधानसभा निवडणूक जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याआधीच राज्याच्या तीन भागांमध्ये मतदारसंघ निश्चित करून भाजपने मंगळवारी प्रत्येक मतदार संघासाठी तीन उमेदवारांचा पसंतीक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला. उर्वरित मतदारसंघात ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप लढणार असलेल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना आमदारकीसाठी कोण उमेदवार हवा आहे याचे तीन पसंतीक्रम घेण्यात आले. एका कागदावर हे पसंतीक्रम घेऊन नंतर ते लिफाफा बंद करण्यात आले. यापैकी काही मतदारसंघांवर शिंदे सेना आणि अजित पवार गटानेही दावा सांगितलेला असताना आपली उमेदवार शोध मोहीम गतिमान केली आहे. मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी असे पसंतीक्रम घेण्यात येणार आहेत.

गोवा आणि बिहारचा लिफाफा पॅटर्न विधानसभा निवडणुकीसाठी भाजप संघटनेत वेगवेगळे प्रयोग करीत आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेशच्या टीमकडून प्रचार यंत्रणा राबविणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बौद्धिक वर्ग झाल्यानंतर आता गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला लिफाफा पॅटर्न राज्यात आणला.

नगरमध्ये गोंधळ : मुंढे समर्थक घुसविण्याचा प्रयत्नअहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्यावेळी प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे समर्थकांनी मतदानाचा आग्रह धरत गोंधळ घातला. त्यांना पक्ष निरीक्षकांनी मतदान करू दिले. मात्र, ज्यांची नावे यादीत नसतील त्यांची मते ग्राह्य धरणार नाही, असे पक्षनिरीक्षकांनी स्पष्ट केले.

कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघांत झाले भाजपचे मतदानमराठवाडा :  छत्रपती संभाजीनगर :  औरंगाबाद पूर्व, फुलंब्री, गंगापूर | जालना : भोकरदन, परतूर |  लातूर : लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, उदगीर, निलंगा | नांदेड : नायगाव, भोकर, मुखेड, देगलूर, किनवट | परभणी : जिंतूर, गंगाखेड विदर्भ : अमरावती : तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट | अकोला : अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, अकोट | बुलढाणा : चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर | यवतमाळ : यवतमाळ, वणी, राळेगाव, उमरखेड, आर्णी | वाशिम : वाशिम, कारंजा, रिसोड | नागपूर : कामठी, उमरेड, सावनेर, काटोल, हिंगणा, नागपूर पूर्व | गोंदिया : गोंदिया, तिरोडा, देवरी | गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी | भंडारा : साकोली | वर्धा : वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट उत्तर महाराष्ट्र : अहमदनगर : अहमदनगर शहर, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, कर्जत जामखेड, श्रीगोंदा, संगमनेर  | जळगाव : भुसावळ, जामनेर, जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर

टॅग्स :BJPभाजपा