शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 2:17 PM

माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले असं आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या.

नागपूर - ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजपाच्या नाशिक येथील महिला आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. एका निनावी पत्राचा हवाला देत सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत फरांदेंवर आरोप केले होते. त्यावरून आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारेंवर सभागृहात हल्लाबोल केला.

आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या असतील परंतु त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या निनावी पत्रावरून पुण्यात माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. मी गेली ३० वर्ष राजकारणात विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतेय. मी आजपर्यंत कुणावरही पुरावा नसताना आरोप केला नाही. या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावे. सुषमा अंधारे यांनी १८ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र देऊन आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केली.पोलीस आयुक्तांनाही पत्र दिले. गेली ४ अधिवेशन मी सातत्याने ड्रग्सविरोधात लढा देतेय. नाशिकला ड्रग्समुक्त करण्यासाठी लढतेय असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले. मी या विषयावर सातत्याने बोलतेय. मात्र ललित पाटील हे उबाठा सेनेचे असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत मी पुराव्यासह विधानसभेत हक्कभंग सुषमा अंधारेंवर दाखल करावा अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी माझ्याकडे तुम्ही प्रस्ताव सादर करा. मी तपासून उचित निर्णय घेईल असं आश्वासन दिले. 

काय केले होते सुषमा अंधारे यांनी आरोप?ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मला निनावी पत्र प्राप्त झाले. ती मी पुणे पोलिसांना दिले आहे. पत्रात जे संदर्भ दिलेत त्यात कुठलाही पुरावा नाही. या पत्रात छोटी भाभी उर्फ शेख याला अटक केली तर बडी भाभी कोण? असा म्हणत अंधारेंनी अप्रत्यक्षपणे देवयानी फरांदे यांच्याकडे बोट दाखवले होते.  

टॅग्स :Devyani Farandeदेवयानी फरांदेSushma Andhareसुषमा अंधारेNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन