शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत चुरशीची लढत, शिंदेगटाचीही मुसंडी तर शिवसेनेची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:05 IST

Gram Panchayat Election Result: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू ग्रामपंचायत निवडणुकीच्या  मतमोजणीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे

मुंबई - राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू ग्रामपंचायत निवडणुकीच्या  मतमोजणीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने तिसरे स्थान पटकावले आहेत. तर शिंदे गटाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. या निकालांमध्ये शिवसेनेचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं चित्र असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. 

एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी ३९८ ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाने ११६ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १०४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने ४५ ग्रामपंचातींमध्ये आपल्या विचयाचा झेंडा रोवला आहे. तर बंडखोर शिंदे गटाने ३९ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. 

पक्षामध्ये झालेल्या फुटीचा मोठा फटका शिवसेनेला बसलेला दिसत आहे. शिवसेनेला आतापर्यंत केवळ २० ग्रामपंचायतींमध्येच विजय मिळालेला दिसत आहे. तर इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी ७४ ठिकाणी विजय मिळवला आहे.

आघाडीवार विचार केल्यास भाजपा आणि शिंदे गटाला आतापर्यंत १५५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीने १६९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. अद्याप दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आता या निकालांमध्ये नेमका कोणाचा विजय होणार, याचं चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना