शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात भाजपा आणि ठाकरे गटात तुफान राडा, धक्काबुक्की, हणामारी, आमदार वैभव नाईकही रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 09:35 IST

Kankavali Rada: राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काल पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली.

राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काल पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. कणकवलीमधील कनेडी गावातील बाजारपेठेत भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याने या वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की केली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हेही घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान, हातात दांडा घेऊन जमावासमोर गेलेल्या वैभव नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास भाजपाचे पदाधिकारी असलेल्या संदेश सावंत यांनी कनेडी बाजारपेठेमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते असलेल्या रिक्षाचालक कुणाल सावंत यांना किरकोळ वादानंतर मारहाण केल्याने या वादाला तोंड फुटले. या मारहाणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. तसेच संदेश सावंत यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. 

त्यानंतर भाजपाचेही कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी संजना सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यालयावऱ चाल केली. तिथेही धक्काबुक्की झाली. यादरम्यान, आपला मोबाईल हरवल्याचा दावा संजना सावंत यांनी केला. तसेच तो परत मिळवून द्या, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. 

तर वाद विकोपाला जात असल्याची वार्ता पसरल्यावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर जमू लागले. तसेच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हेही कार्यालयात दाखल झाले, यावेळी स्वत: वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन शिवसैनिकांवर चाल करून येत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जात असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तसेच दहशत खपवून घेतली जाणारा नाही असा इशाराही ठाकरे गटातील नेते सतीश सावंत यांनी दिला. दरम्यान, या राड्यामध्ये दोन्हीकडून लाठ्या काठ्या आणि काचेच्या बाटल्यांचाही एकमेकांवर मारा करण्यात आला. त्यात कुंभवडेचे माजी सरपंच आप्पा तावडे हे डोक्यावर लाकडी दांडा बसल्याने जखमी झाले. तर कुणाल सावंत आणि भाजपा कार्यकर्ते रुपेश सावंत हेही जखमी झाले. या घटनेनंतर कनेडी बाजारपेठेत तणावाचे वातावरण होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना