शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

धक्कादायक खुलासा! संजय राऊत धमकी प्रकरणी एकाला अटक; सुरक्षेसाठी रचला होता खोटा बनाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:21 IST

पोलिसांकडून ही माहिती समोर येताच भाजपा-मनसेने संजय राऊतांवर निशाणा साधला.

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. त्याबाबत पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांना या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचाच निकटवर्तीय असल्याची चर्चा असून राऊतांची सुरक्षा वाढावी यासाठी हा बनाव रचल्याचं बोलले जात आहे. 

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून मयूर शिंदे हा संजय राऊतांच्याही जवळचा आहे. संजय राऊतांची सुरक्षा वाढावी यासाठी मयूर शिंदेने हा बनाव रचला. मयूर शिंदेने स्वत: फोन केला नव्हता तर इतर साथीदारांना फोन करायला सांगितले. मयूर शिंदे हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली. 

भाजपा-मनसेचा राऊतांवर निशाणापोलिसांकडून ही माहिती समोर येताच भाजपा-मनसेने संजय राऊतांवर निशाणा साधला. भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत यांचा तीन पैशांचा तमाशा लोकांच्या समोर आला आहे. ज्या प्रकारे मयूर शिंदेला अटक केली. खोटी धमकी दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची, सरकारची, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस आयुक्ताना विनंती आहे मयूर शिंदे कोण आहे कुठल्या गँगस्टरशी संबंध आहे? संजय राऊत याला साथ का देत आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत यांच्यावर सरकारची जनतेची पोलिसांची धोकाधडी खोटारडेपणा असे गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली. 

तर संजय राऊत यांना जेव्हा धमकी दिली तेव्हा मी ट्वीट केलं होत कार्तिक कॉलिंग कार्तिक असा चित्रपट आला होता, तसेच संजय राऊत कॉलिंग राऊत आहे. ज्यांनी धमकी दिली तो ह्या दोन्ही राऊत बंधूंचा अत्यंत जवळचा साथीदार आणि गैंगस्टर आहे. म्हणजे हे दोघं लबाड सोबत मूर्ख पण आहेत. कोणाकडून धमकीचा फोन करुन घ्यावा हे कळत नाही. सुरक्षा मिळावी म्हणून हा प्रयत्न होता. आगामी काळात जनता यांना लाथा मारल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना टार्गेट केले. 

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर लावले आरोप मयूर शिंदे हा सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा...राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाMNSमनसे