शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 09:46 IST

आत्ताची निवडणूक महाभारतासारखी, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यंदा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय असं सांगत ठाकरेंनी भाजपावरही टीका केली.

मुंबई - Uddhav Thackeray on Eknath Shinde ( Marathi News ) त्यांची शिवसेना म्हणजे एसंशी, मी त्यांचे पूर्ण नाव घेत नाही, जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे जे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते, म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. त्यामुळे त्यांचे नाव एसंशी आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.  

संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे विधान केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का घेऊ? तुम्ही गद्दारी करून राजकारणातील आईशी हरामखोरपणा केला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. ही गद्दारी महाराष्ट्रात चालणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तर आत्ताची निवडणूक महाभारतासारखी, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यंदा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. ही लोकशाही वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केले पाहिजे. लोकशाहीचे धिंडवडे निघतायेत, संविधान पाळलं जात नाही. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची सुनावणी होत नाही. तत्कालीन राज्यपालांनी अधिवेशन बोलावणं कसं चूक होतं, मध्यंतरी लवादाने घेतलेला निर्णय, अद्यापही सर्वोच्च न्यायालयातून निकाल आलेला नाही. तरीही पंतप्रधान माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतायेत, त्यामुळे अप्रत्यक्ष दबाव सर्वोच्च न्यायालयावर आणताय का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

दरम्यान, मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. हे गजनी सरकार आहे. २०१४ साली ते बोलले, ते २०१९ ला आठवत नाही, २०१९ ला जे बोलले ते आता आठवत नाही. जनतेच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला नाही. जनता २ वेळा मुर्ख बनली आहे आता जनता पेटली आहे. अनेक भूलथापा यांनी दिल्या, भ्रष्टाचारांना घेतायेत, पक्ष फोडले, महाराष्ट्राने गद्दारी कधीच सहन केली नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

महाराष्ट्राचं प्रेम पाहिलं, आता श्राप अनुभवावा

जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत राज्यातले उद्योगधंदे पळवण्याची बिशाद नव्हती. आता गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन लागल्यानंतर ज्या वेगाने उद्योगधंदे पळवले, आज आपल्या हातात सत्ता नाही. महाराष्ट्रात बेकारी, बेरोजगारी वाढतेय. हा राग आहे. आम्ही तुम्हाला दिले होते, तुम्ही आमचा का घात केला, महाराष्ट्राचा घात का केलात? आज महाराष्ट्रात मोदी गल्लीबोळात फिरतायेत, जरूर फिरावं, महाराष्ट्राचा संताप, आक्रोश अनुभवला पाहिजे. गेली १० वर्ष महाराष्ट्राचे प्रेम, आशीर्वाद मिळाले आणि महाराष्ट्राचा श्राप काय असतो तो मोदींनी अनुभवावा असंही ठाकरेंनी मुलाखतीत म्हटलं. 

शिवसेनेचा नव्हे तर महाराष्ट्राचा घात केला

माझ्या छातीवर मशाल, पण जनतेच्या हृदयात मशाल पेटली आहे. २०१४ आणि २०१९ ला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पोहचले त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. ४० पेक्षा अधिक खासदार महाराष्ट्राने दिले. महाराष्ट्राने इतके भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेचा घात केला नाही तर महाराष्ट्राचा घात केला. शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आणि हिंदुत्वाचा जागर करणारी आहे. महाराष्ट्राचा घात एवढ्यासाठी की, राज्यातले अनेक उद्योगधंदे गुजरातला नेले, मुंबईतले अनेक उद्योग गुजरातला पळवले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४