अमरावतीत खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 09:03 IST2022-04-24T09:03:28+5:302022-04-24T09:03:48+5:30
योगेश घारड यांच्या कमरेत गोळी शिरल्याची माहिती असून घटनेला प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दुजोरा दिला आहे.

अमरावतीत खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार
अमरावती – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश बाबाराव घारड यांच्यावर वरूड येथील मुलताई चौकात गोळीबार करण्यात आला. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घारड यांना उपचारासाठी तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी वरूड पोलिसांनी संशयित म्हणून राहुल राजू तडस आणि अन्य एकाचा कसून शोध चालवला आहे.
योगेश घारड यांच्या कमरेत गोळी शिरल्याची माहिती असून घटनेला प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दुजोरा दिला आहे. अद्याप घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा वरूडमध्ये आहे. घटनेवेळी घारड हे मुलताई चौकात उभे होते. काही कळण्याच्या आत दोनपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली अशी माहिती समोर आली आहे.