एसटीचे वेळापत्रक सुधारणार

By Admin | Updated: August 29, 2016 05:45 IST2016-08-29T05:45:31+5:302016-08-29T05:45:31+5:30

एसटी बसची सद्यस्थिती, तसेच त्याच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम (व्हीटीएस)बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Improve the schedule of ST | एसटीचे वेळापत्रक सुधारणार

एसटीचे वेळापत्रक सुधारणार

मुंबई : एसटी बसची सद्यस्थिती, तसेच त्याच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा समजण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसना व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम (व्हीटीएस)बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे एसटीचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी आशा एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. याबाबतचा पहिला प्रयोग एसटीच्या सातारा विभागातील सर्व बसवर केला जाईल.
एसटी बसचे वेळापत्रक सुधारण्यास मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाकडून नव्या यंत्रणेवर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात कधी-कधी वेळेवर पोहोचत नाही. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवरही होतो. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजावा, यासाठी एसटी महामंडळाने व्हीटीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास, त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल. एसटी बसना व्हीटीएस यंत्रणा बसविण्याचा पहिला प्रयोग सातारा विभागातील एसटीच्या जवळपास ७00 बसेसवर केला जाणार आहे. या संदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही यंत्रणा बसविली जाईल. ही यंत्रणा लागल्यास बसची सद्यस्थिती समजेल. बस सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळेचीही नोंद होईल. त्याचा फायदा वेळापत्रक सुधारण्याबरोबरच प्रवाशांनाही होईल. 

Web Title: Improve the schedule of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.