मुख्यमंत्रिपदापेक्षा ऊस तोडणी कामगारांना महत्त्व - पंकजा

By Admin | Updated: September 18, 2014 01:52 IST2014-09-18T01:52:44+5:302014-09-18T01:52:44+5:30

माङयासाठी मुख्यमंत्री पदापेक्षा लवादावर जाणो महत्त्वाचे असून कामगारांना न्याय मिळवून देणार आहे, अशी ग्वाही भाजपाच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांनी येथील संघर्ष यात्रेत दिली.

Importance of sugarcane workers more than Chief Minister - Pankaja | मुख्यमंत्रिपदापेक्षा ऊस तोडणी कामगारांना महत्त्व - पंकजा

मुख्यमंत्रिपदापेक्षा ऊस तोडणी कामगारांना महत्त्व - पंकजा

पाथर्डी (जि.अहमदनगर) : गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी कामगारांवर निर्वाज्य प्रेम केले. सध्या तोडणी कामगारांचा संप सुरू  आहे. त्यांचे प्रश्न लवादामार्फत सोडविले जातात. मात्र सरकार ऐकून न ऐकल्यासारखे करीत आहे. माङयासाठी मुख्यमंत्री पदापेक्षा लवादावर जाणो महत्त्वाचे असून कामगारांना न्याय मिळवून देणार आहे, अशी ग्वाही भाजपाच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांनी येथील संघर्ष यात्रेत दिली. 
विधानसभा निवडणुकीत मुंडे यांचे स्वपA पूर्ण करण्यासाठी सत्ता परिवर्तन करा, असे आवाहनही त्यांनी केले. मुंडेसाहेब नेहमी म्हणायचे, परळी माझी आई तर पाथर्डी मावशी आहे. त्यांनी पाथर्डीवर जेवढे प्रेम केले त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम पाथर्डीकरांनी त्यांच्यावर केले. त्यांचाच वारसा घेवून मी रणांगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Importance of sugarcane workers more than Chief Minister - Pankaja