नामांकित पुरस्कार शासकीय नोकऱ्यांसह तोतया आयएएसओएसडींची टोळी बड्या लोकांच्या लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी लाखो रुपये मोजत होती. तोतया महिला आयएस अधिकारी कल्पना भागवत चा प्रियकर मोहम्मद आश्रफ गिल, तोतया ओएसडी देवेंद्र कुमार हरजाई व श्रीगोंदा चा जमीन व्यवसाय दत्तात्रय थेटे यांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली असून यासाठी पैसे घेतल्याचे बँक व्यवहारात निष्पन्न झाले.
शहरातील महिला तोतया आयएएस अधिकारी कल्पना न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र आश्रफ,डीपी पोलीस कोठडीत होते त्यांच्यासोबत शनिवारी अटक केलेला शेटे पोलीस कोठडीत होता. मंगळवारी तिघांच्या पोलीस कोठडीच्या कालावधी संपला, त्यानंतर तपास पथकाने तिघांना दुपारी न्यायालयात हजर केले यात आश्रफ व डीपीचा बँक व्यवहारातून आणखी व्यवहार समजले असून पैसे दिलेल्यांना साक्षीदार करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून या टोळीने विविध कारणांनी पैसे उकळल्याचे निष्पन्न झाल्याची बाजू सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. एकंदरीत या टोळीमध्ये नवनवे कारनामे रोज उघडकीस येत आहेत. यातच विविध शासकीय नोकऱ्या नामांकित पुरस्कारांसोबत तोतया अधिकाऱ्यांच्या या टोळीने अनेक बड्या असामींना त्यांच्या कुटुंबाच्या लग्नात देशातील व्हीआयपी आणण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी लाखो रुपये उकळले यातील एक लाख रुपयांच्या व्यवहार उघडकीस आला असून, या व्यक्तीचा देखील पोलिसांना शोध लागला आहे. या घोटाळ्यात आश्रफने अनेक व्यवहार सांभाळल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान नामांकित पुरस्कारासाठी शिफारस पत्र, सन्मानपत्र असल्याचा दावा करणाऱ्यांची चौकशी केली जाणार असून, त्यांची कागदपत्रे खरे की खोटी याबाबतही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.