शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 07:10 IST

अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.  

विनय उपासनी -

मुंबई :  समृद्धी महामार्गावरअपघातांची मालिका सुरूच असून, अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात आता ‘इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर’ या अत्याधुनिक प्रणालीची भर पडणार आहे. अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.   

कुठे बसवणार?- शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंतचा ८० किमी लांबीचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.- या टप्प्यात इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर बसविण्याचे काम सुरू आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पट्ट्यातही इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर प्रणाली बसवली जाणार आहे.  

काय आहे इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर?- वाहनाच्या धडकेमुळे वाहने आणि वाहनचालकांना होणारे नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने इम्पॅक्ट ॲटेन्यूएटरची निर्मिती करण्यात आली आहे. - अपघातावेळी आदळणाऱ्या वाहनाची गतीज ऊर्जा इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर शोषून घेते. - त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी होऊन अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी सुरक्षित राहतील.- ७०१ किमी लांबीच्या संपूर्ण समृद्धी महामार्गावर टप्प्याटप्प्याने ही प्रणाली स्थापित केली जाणार आहे. 

इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर प्रणाली एक प्रकारचे शॉक ॲब्झॉर्बरचे काम करेल. त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. - संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातhighwayमहामार्ग