शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अमरापूरकरांच्या अस्थींचे विधी न करता विसर्जन

By admin | Updated: November 17, 2014 03:36 IST

ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले

अहमदनगर : ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले. अमरापूरकर यांनी मृत्यूनंतर एकप्रकारे नव्या पिढीला पुरोगामी विचारांचे संस्कार दिले.दशक्रिया व त्यानंतरचा तेराव्याचा विधीही त्यांच्या कुटुंबियांनी केला नाही़ तसेच वर्षश्राद्धही होणार नाही़ माझ्या मृत्यूनंतर माझा कुठलाही धार्मिक विधी करू नका, फक्त माझे विचार, कार्य आणि संस्कार जिवंत ठेवा, अशी अमरापूरकरांची इच्छा होती़ सजग अभिनयाने चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणारे नगरचे भूमिपुत्र सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबरला मुंबईत निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या मुलींनी त्यांना अग्नी दिला़ एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रत्येक धर्मात एक वर्ष मोठा धार्मिक विधी असतो़ मात्र, अमरापूरकर यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळीशी संबंध ठेवून पुरोगामी विचारांची जोपासना केली़अंधश्रद्धा कर्मकांडाला विरोध केला़ त्यांच्या इच्छेनुसार निधनाच्या दुसऱ्या दिवशी अस्थींचे धार्मिकस्थळी विसर्जन न करता त्यांच्या खंडाळा येथील शेतात आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली़ वृक्षांच्या खोडाला अस्थी समर्पित करण्यात आल्या़ अशा प्रकारे सामाजिक चळवळीशी बांधिलकी जपणारा आणि पुरोगामी विचारांची शिदोरी घेऊन वावरणारा माणूस मरणानंतरही पुरोगामी विचार पुढच्या पिढीला देवून गेला. त्यांच्या या विचारांचा ठसा समाजावर कायम राहील, अशी भावना व्यक्त झाली. (प्रतिनिधी)