अत्याचाराच्या घटनांचा निकाल लवकर लागावा

By Admin | Updated: August 1, 2016 01:27 IST2016-08-01T01:27:53+5:302016-08-01T01:27:53+5:30

पशुला लाजवेल अशी क्रूर हत्या कोपर्डीत घडली़ ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे़

Immediately take the consequences of incidents of abuse | अत्याचाराच्या घटनांचा निकाल लवकर लागावा

अत्याचाराच्या घटनांचा निकाल लवकर लागावा


कर्जत (अहमदनगर) : पशुला लाजवेल अशी क्रूर हत्या कोपर्डीत घडली़ ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे़ आरोपींना कायद्याची जरब बसावी, यासाठी कोर्टातून लवकर निकाल लागावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली़
पवार यांनी कोपर्डी येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले़ त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला़ कोपर्डीकरांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देतानाच पवार यांनी कोपर्डी ग्रामस्थांचे संयमाबद्दल आभार मानले़ ते म्हणाले, कोपर्डीसारख्या क्रूर घटनांचा निकाल तत्काळ लागला पाहिजे़ निकालाला विलंब होत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढते, तर समाजाचे मनोबल खचते़ यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत़ पीडित कुटुंबातील मुलगी व मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेणार आहोत़ अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी चर्चेतून मार्ग काढणार असल्याचेही पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Immediately take the consequences of incidents of abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.