शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

आयुर्वेद शस्त्रक्रिया परवानगीला 'आयएमए'चा विरोध; ११ डिसेंबरला वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 7:25 PM

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे..

ठळक मुद्देप्रस्तावित अभ्याक्रमाच्या पदवीच्या नामकरणालादेखील आयएमएचा सक्त विरोधसीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनने २० नोव्हेंबर रोजी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या सूचनेत एकूण ५८ शस्त्रक्रिया आयुर्वेदातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आंदोलनाचा बडगा उगारला आहे. यामध्ये सुरुवातीला शांततामय निदर्शने केली जाणार असून, ११ डिसेंबर रोजी अत्यावश्यक वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सीसीआयएमने केलेल्या दाव्यानुसार, या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अ‍ॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत. अ‍ॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे अतार्किक ठरेल, अशी भूमिका आयएमएतर्फे मांडण्यात आली आहे.

प्रस्तावित अभ्याक्रमाच्या पदवीच्या नामकरणालादेखील आयएमएचा सक्त विरोध आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रातील औषधे, शस्त्रक्रिया परस्पर शिकवण्यासाठी सेन्ट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला कोणतेही हक्क नाहीत. त्यांना नॅशनल मेडिकल कमिशनची अधिकृत परवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती आयएमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.---------------आयएमएच्या मागण्या :१. सीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी.२. मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व ४ समित्या बरखास्त करा.३. भारत सरकारने सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये आणि प्रकारांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यायला हवे आणि त्यांचा विकास करण्याची भूमिका ठेवली पाहिजे.

-------------------कसे असेल आंदोलन?

अधिसूचनेविरोधात आयएमएअंतर्गत मेडिकल स्टुडन्टस नेटवर्कमधील विद्यार्थी आणि ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क २ डिसेंबरपासून शांततामय निदर्शने करतील. आयएमएच्या आंदोलनास महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (मार्ड) यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ८ डिसेंबर रोजी आयएमए सदस्य २०-२० डॉक्टरांच्या गटात निदर्शने करतील. ११ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान कोव्हिड सेवा वगळता सर्व अत्यावश्यक नसलेल्या सेवा बंद राहतील. केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमएतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. आयएमएच्या सर्व राज्य शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये आणि स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमधील खटले दाखल करतील.

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलAyurvedic Home Remediesघरगुती उपायStudentविद्यार्थी