शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 17:59 IST

राफेल विमानाची किंमत गुप्त का ठेवता? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला

बीड: राफेल विमानाची किंमत गुप्त का ठेवता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी सरकार स्पष्टीकरण देणारच नसेल, तर आरोप होतच राहणार. त्यामुळे सरकारनं राफेल विमान खरेदीबद्दलची माहिती संसदेत द्यावी, अशी मागणी पवार यांनी बीडमध्ये बोलताना केली. राफेल प्रकरणात आपण मोदींचं समर्थन केलं नसल्याचंही ते म्हणाले. बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पवार यांनी राफेल विमान खरेदीबद्दल भाष्य केलं.राफेल कराराबद्दलच्या शरद पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या तारीक अन्वर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर बोलताना मी राफेल करारावरुन होणाऱ्या आरोपांबद्दल पंतप्रधान मोदींचं समर्थन केलं नाही, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं. 'मनमोहनसिंग सरकारच्या काळात राफेल विमान ६५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मोदी सरकारने हेच विमान १६०० कोटी रुपयांना खरेदी केले. याचे समर्थन मी अजिबात केलेले नाही. ६५० कोटींचे १६०० कोटी का झाले, याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं द्यावं. याची सर्वपक्षीय चौकशी व्हावी, अशी मागणी संसद सदस्यांनी केली आहे. बोफोर्सची चौकशी करा म्हणणारे राफेलच्या बाबतीत का गप्प आहेत?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याआधी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी राफेल खरेदीवर भाष्य केलं होतं. या प्रकरणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती. 'राफेलवरून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र मुळात या कराराबाबत योग्य ती माहिती समजावून घेणं आवश्यक आहे. देशाला राफेल विमानांची गरज आहे, राफेल विमानं उत्तम आहेत. तरीही विरोधक संसदीय समिती स्थापनेची मागणी करत असतील, तर सरकारनं समिती स्थापन करून याची चौकशी करावी. विमानाच्या तांत्रिक बाजू जाहीर केल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरेल. त्यामुळे शत्रूराष्ट्राला विमानाच्या तीव्रतेची जाणीव होईल. या प्रकरणावर सामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा