शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीनं देऊ केलेल्या लोकसभेच्या तिकीटावर उज्ज्वल निकम म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 23:07 IST

उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणूक लढविण्यास तूर्त नकार

जळगाव- विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊ केल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. यावर निकम यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. तूर्तास माझा राजकारणाचा प्रवेश करण्याचा मानस नाही. सध्या माझ्याकडे अनेक खटल्यांची कामं आहेत, असं निकम म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने निकम यांना जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर निकम आज पत्रकार दिनासाठी आले असताना राष्ट्रवादीचे नेते अरुण भाई गुजराथी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र निकम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. 'अरुण गुजराथी यांनी व्यक्त केलेल्या सद्भभावनेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र राजकारण हा माझा सध्याचा पिंड नाही. याबद्दल मी अद्याप गांभीर्यानं विचार केलेला नाही. कारण सध्या अनेक खटल्यांच्या कामात मी व्यस्त आहे. पुढे मी याबद्दल विचार करु शकतो. मात्र आज तरी मी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही,' असं निकम म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकम यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याचा आग्रह केला. 'राजकारणात चांगली माणसं येणं गरजेचं आहे. जळगावला तुमच्यासारखा अभ्यासू आणि उच्चशिक्षित खासदार मिळेल. त्यामुळे तुम्ही आमच्या आग्रहाचा विचार करा,' असं आवाहन गुजराथी यांनी केलं.   

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९