शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:12 IST

Illegal forest land acquisition case: जे. एम. म्हात्रे यांच्या दादर, पनवेल येथील मालमत्तांवर ईडीने छापा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पनवेलचे माजी नगराध्यक्ष, जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे. एम. म्हात्रे यांच्या दादर, पनवेल येथील मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने छापा टाकला हाेता. त्यात, म्हात्रे यांच्या बँकेतील ४४ कोटींच्या शिल्लक रकमेसह ठेवी, म्युच्युअल फंड गोठविण्यात आले आहे. १६.५ लाखांची रोकड जप्त केली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रे यांनी २००५ मध्ये सातबारा उताऱ्यात फेरफार करून पनवेल तालुक्यातील वहाळ  गावातील वन विभागाच्या अखत्यारीतील भूखंड अवैधरीत्या ताब्यात घेतला आणि त्यातील काही भाग स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)ला विकला. तसेच मोबदला म्हणून ४२ कोटी रुपये मिळविले, असा आरोप म्हात्रे यांच्यावर आहे. या प्रकरणी वन विभागाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पनवेल पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२४ मध्ये म्हात्रे आणि सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

वन विभागाची जमीन बळकावली आणि विकली   १९७५ मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र खासगी वन (अधिग्रहण) कायदा, १९७५च्या तरतुदींनुसार जमीन अधिग्रहित केली होती. त्यानंतर ७/१२ उताऱ्यातील मालकाचे नाव महाराष्ट्र सरकारचा वन विभाग असे बदलण्यात आले. पुढे नोंदीमध्ये फेरफार करण्यात आला. मालकाचे नाव ‘वन विभाग, महाराष्ट्र सरकार’ हे बदलून म्हात्रेंनी आपले नाव लावले. शिवाय त्यांनी जमिनीचा तुकडा एनएचएआयला बेकायदेशीररीत्या विकला. त्यापोटी म्हात्रे यांना ४२.४ कोटी आणि कादरी यांना ९.६९ कोटी रुपये बेकायदेशीर भरपाई मिळाल्याचे तपासांतून स्पष्ट झाले. म्हात्रे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्रraidधाड