शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘समृद्धी’च्या कंत्राटदारांचे अवैध उत्खनन, कोट्यवधींची लूट; बुलडाणा, वाशिममध्ये बदलले कंत्राटदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:13 PM

वाशिम जिल्ह्यात महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक लि. या कंपनीविरोधात मालेगाव तालुक्यात पॅकेज ५ अंतर्गत अवैध उत्खननप्रकरणी ३.५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला. 

बुलडाणा / वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची अवैध उचल करणाऱ्या जालना जिल्ह्यातील कंत्राटदाराला ठोठावण्यात आलेला कोट्यवधीचा दंड भरावाच लागेल, असे औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले असतानाच, राज्यातील इतर काही कंत्राटदारांनीही अशाच प्रकारे अवैध गौण खनिज उत्खनन केल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. तसेच, अनेक ठिकाणी कामे विलंबाने सुरू असून, अवैध उत्खनननामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाशिम : कंत्राटदाराला ३.५५ कोटींचा दंड-     वाशिम जिल्ह्यात महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक लि. या कंपनीविरोधात मालेगाव तालुक्यात पॅकेज ५ अंतर्गत अवैध उत्खननप्रकरणी ३.५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला. -     पॅकेज ५ अंतर्गत ८३ रचनांपैकी केवळ २३ रचना पूर्ण झाल्या आहेत. दीड वर्षापूर्वी कामाचा दर्जा आणि संथगतीमुळे सद्भाव इंजिनिअरिंग कंपनीकडून काम काढून घेऊन ते ॲपकोला देण्यात आले. मात्र, ॲपकोचे कामही संथगतीने होत आहे. 

बुलडाणा - प्रकल्प क्षेत्राबाहेर जाऊन उत्खनन-     प्रकल्प क्षेत्राबाहेर जाऊन गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पॅकेज सहाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीला गेल्या वर्षी ३२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, कंपनीने अजून दंड भरला नाही. प्रकरण सध्या अमरावती विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आहे.-     मेहकर तालुक्यातील डोणगाव व आंध्रुड परिसरातील सर्व्हे नं. ३५६ मधील २०८२ आर या शेतजमिनीवर विनापरवाना उत्खनन झाले. ४ फेब्रुवारी २०२० रोजी मेहकरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी दंडाची कारवाई केली. ६६ हजार ९०० ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले.-     शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी महामार्गालगत तीन फुटांचा सेवारस्ता सोडण्यात आला असला तरी माल भरलेले ट्रॅक्टर, हार्वेस्टर या मार्गावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

प्रकरणाची चौकशी सुरूसध्या या संदर्भातील प्रकरण विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. या प्रकरणात जवळपास ३२ कोटी रुपयांचा दंड संबंधित कंपनीला झाला आहे.- उदय भरडे, एमएसआरडीसी अधिकारी, बुलडाणा. पॅकेज ४ ची जबाबदारी पीएनसी इन्फ्राटेक लि. कंपनीकडे, तर पॅकेज ५ ची जबाबदारी ॲपको इंजिनिअर्स प्रा. लि.कडे आहे. पॅकेज ५ मध्ये शेतजमिनीवर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ॲपको कंपनीला ३.५५ कोटींचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात चौकशीत आहे.- रवी काळे, तहसीलदार, मालेगाव (वाशिम)समृद्धीच्या कामासाठी शेतात अवैध उत्खनन केल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून मालेगाव तहसीलदारांनी आमच्या कंपनीला दंडाचा आदेश दिला. त्याविरोधात आम्ही वाशिम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील केले असून, या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.- राजीव तिवारी, जनसंपर्क अधिकारी, ॲपको इंजिनिअर्स 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणाwashimवाशिम