शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

लढायचं असेल तर ताकदीनं लढा, हे काय...; एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 19:49 IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील असं खडसेंनी म्हटलं.

जळगाव - सत्तेचा दुरुपयोग करत नियमांची तोडफोड करुन राजकारण केलं जात आहे. लढायचं असेल ताकदीने लढा, हे काय घाणेरड्या पद्धतीने बच्चो बच्चो राजकारण तुम्ही खेळताहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून पुन्हा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला.  

एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची असल्याचा निर्णय झाला असून यासाठी ४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारांचा आमच्या बाजूने मोठा प्रतिसाद आहे. ४५१ पैकी ४४८ सभासदांची मी स्वत: बोललो आहे. सध्यस्थितीत विरोधकांकडून जे राजकारण चाललं आहे याविषयी जनतेमध्ये मोठी चीड आहे. मंत्री, आमदार खासदार असतांनाही जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे असं सांगत त्यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. 

तसेच जिल्हा दूध संघात भ्रष्टाचार दिसत असेल, तर फॉरेन्सिक ऑडिट करा, माझी तयारी आहे. यात जे निष्पन्न होईल त्याआधारे कारवाई करा. निवडणुका पाहूनच जिल्हा दूध संघातल प्रकरण समोर आणलं.  याला अटक करणं, त्याला अटक करणं, कशाला करताहेत, ताकद असेल ताकदीने निवडणूक लढा असं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं.

संजय पवार म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी नव्हेराष्ट्रवादीचे संजय पवार हे विरोधकांकडून जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवित असल्याची चर्चा आहे, यावर एकनाथ खडसेंनी त्यांच मत व्यक्त केले. एकटे संजय पवार हे सोडून गेले म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष तिकडे गेला असा अर्थ होत नाहीये. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली. तर यावर बोलतांना माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनीही पवार यांना टोला लगावला आहे. त्याला जिकडे जायंच, जाऊद्या, त्यांना त्यांचे विचार पटले असतील, म्हणून ते गेले असतील, पण राष्ट्रवादीला बदनाम करु नये, असा टोला डॉ सतीश पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा एकसंघ असल्याचे जरी सांगितले जात असले तरी दरम्यान यावरुन जिल्हा संघाच्या निवडणुकीत संजय पवार विरोधकांना जावून मिळाल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे बोलले जात आहे.

गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधी घडलं नाहीजितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील मात्र जितेंद्र आव्हाड यांना त्रास देण्यासाठी छळ करण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात अनुभव येत आहे. अगदी गलिच्छ राजकारण, घाणेरडं राजकारण यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडलं नाही असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला. शरद पवारांनी आधार दिलागेल्या चाळीस वर्षापासून एकनाथ खडसे राजकारणात आहे. मला एकटे पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, भाजपने मला उमेदवारी दिली नाही, पण शरद पवार यांनी आधार दिला आहे. मी आमदार आहे, मला काय एकाकी पाडतील, कितीही एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तर जनता माझ्यासोबत आहे. यांनी तर जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक बुडवल्या होत्या त्यांचा विकास मी केला, आताही यांचा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत हेतू स्वच्छ नाही. यांना त्यातून काही तरी कमवायचं आहे असा आरोप खडसेंनी विरोधकांवर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा