शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्ष सोबत न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्लान बी तयार, लढवणार एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेसोबत आघाडीच्या नेत्यांची चर्चामात्र नवे मित्र पक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लान बी तयार

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेसोबत आघाडीच्या नेत्यांची चर्चाही सुरू आहे. मित्रपक्षांसाठी मिळून एकूण आठ जागा सोडण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र नवे मित्र पक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्लान बी तयार ठेवला आहे. सद्यस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र प्रकाश आंबेडकर हे 12 जागांवर ठाम आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाल घटनेच्या चौकटीत आणण्यासाठीचा आराखडा देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ताठर भूमिकेमुळे आघाडीचे घोडे अडले आहे.त्यामुळे मित्रपक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्लान बी तयार ठेवला आहे. त्यानुसार अन्य कुठल्याही पक्षासोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण