शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

जनतेच्या मुळावर याल तर सत्तेवरून खाली खेचू, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 17:37 IST

रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही.

रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेला वेठीस धरण्याचे सरकारचे सध्याचे निर्णय पाहता असे करावेच लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पक्ष मेळाव्यात बोलताना दिला.रत्नागिरीतील माळनाका येथे दोन कोटी खर्चातून उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर येथील सावरकर नाट्यगृहात सेना मेळावा झाला. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, सरकारला कर्जमाफी करण्यासाठी शिवसेनेने भाग पाडले. मात्र, त्यानंतरही कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचलेली नाही, हे दुर्दैवी आहे. शिवशाही कर्जमाफी योजना असे नाव देऊन शिवरायांची अशी बदनामी कोण करणार असेल तर ते खपवून घेणार नाही. आम्हाला शिवशाही हवी आहे. चुकीचे वागून लोकांना वेठीस धरणा-यांना धडा शिकवण्याची जी शपथ शिवसैनिकांनी घेतली ती शिवशाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात. तुमची मन की बात काय चाटायची आहे. जनतेच्या मनासारखे निर्णय घेणार नसाल तर मन की बातचा काय उपयोग आहे. जनतेला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करणार, असे ठाकरे म्हणाले.राज्यात मोगलाईसदृश स्थितीराज्यात सध्याची गोंधळाची स्थिती असून जनतेला वेठीस धरणारे निर्णय घेतले जात आहेत. छत्रपतींच्या आधीची मोगलाई असे याचे वर्णन करावे लागेल. सरकारने आता राज्यात मोगलाई आहे, असे एकदाचे जाहीर तरी करावे, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला....तर देशात मोदींना थारा नाहीगुजरातमधील विधानसभा निवडणूकीमुळेच मोदी सरकारला जीएसटी दर कमी करावे लागले. भाजपविरोधी वातावरणामुळे तेथे मोदींना ५० सभा घ्याव्या लागल्या. एवढे करूनही तेथे भाजप जिंकले नाही, जिंकण्यासाठी गडबड केली नाही, तर देशात मोदींना थारा नाही, हेच स्पष्ट होईल, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना