लाँग दिवाळी विकेंड प्लॅन करत असाल तर या शहरांचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:34 PM2017-10-17T15:34:41+5:302017-10-17T16:15:53+5:30

आज आम्ही तुम्हाला भारतातील काही शहरांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे त्या शहरात दिवाळीत काय खास असतं याची माहिती तुम्हाला मिळेल

If you are planning a long Diwali weekend, then think of these cities exactly | लाँग दिवाळी विकेंड प्लॅन करत असाल तर या शहरांचा नक्की विचार करा

लाँग दिवाळी विकेंड प्लॅन करत असाल तर या शहरांचा नक्की विचार करा

Next
ठळक मुद्देजर तुम्हाला सणसमारंभात शॉपिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही राजस्थानमधील या शहरात जाऊ शकता.या काळात हे मंदिर संपूर्णपणे रोषणाईने सजवलेले असतं.इथे नदीवर तरंगते दिवे लावण्यात येतात.ज्यामुळे संपूर्ण शहर दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघते.

शाळा, कॉलेजमध्ये दिवाळीची सुट्टी लागली की मुलांना वेध लागतात ते फिरायचे. यंदा तर शुक्रवार ते रविवार अशी मोठी सुट्टी मिळाल्याने फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग  सुरु आहे. निदान एक दिवसाची तरी ट्रीप व्हायलाच हवी अशी प्रत्येक घरातून ओरड सुरू होते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्यापल्या परिने विविध शहरात दिवाली साजरी करण्यासाठी जात असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही शहरांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे त्या शहरात दिवाळीत काय खास असतं याची माहिती तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्ही सुट्टीसाठी तुमच्या पिकनीकचं प्लॅनिंग करू शकता.

जयपूर, राजस्थान

जर तुम्हाला सणसमारंभात शॉपिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही राजस्थानमधील जयपूर शहरात जाऊ शकता. जयपूर ट्रेड युनिअनमार्फत दिवाळीत विविध शॉपिंग प्रदर्शन, शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केले जातात. जयपूरमधल्या वैशाली नगर, नेहरू बाझार, चौरा रस्ता, राजा पार्क, जयंती बाझार, चंडपोले बाझार या ठिकाणी हे शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केले जातात.

अमृतसर, पंजाब

दिवाळीसाठी सगळ्यात बेस्ट प्लेस म्हणून अमृतसरचीच निवड कित्येक भटकंतीप्रेमी करत असतात. अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमध्ये दिवाळीत एकदा भेट द्यायलाच हवी. अमृतसरमधील शीख बांधव दिवाळीच्या काळातच बंदी छोर दिवस म्हणूनही साजरा केला जातो. गोल्डन टेम्पल या काळात संपूर्णपणे रोषणाईने सजवलेले असतं.

वाराणसी

जर तुम्हाला दिवाळी अगदी पारंपारिक पद्धतीने साजरी करायची असेल तर तुम्ही वाराणसीमध्ये एकदा भेट द्याच. वाराणसी नदीच्या किनाऱ्यावर दिवाळीचा उत्साह पाहण्यासारखा असतो. वाराणसी नदीवर तरंगते दिवे लावण्यात येतात.ज्यामुळे संपूर्ण वाराणसी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघते.

कोलकाता

कोलकात्यात फार वेगळ्या पद्धतीची दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या काळात देवी कालीमाताची आराधना केली जाते. आपल्यात नवरात्री उत्सवाची जेवढी उत्साह असतो तसाच उत्साह येथे दिवाळीच्या काळात पाहायला मिळतो.

गोवा

इतर सणांप्रमाणे दिवाळी सणासाठी अनेकजण गोवा शहराची निवड करत असतात. नरकासुराचा पुतळा जाळून गोव्यात दिवाळी साजरी केली जाते.

Web Title: If you are planning a long Diwali weekend, then think of these cities exactly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.