आम्ही आग लावणारे नाही तर विझविणारे आहोत - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: March 12, 2016 03:58 IST2016-03-12T03:58:57+5:302016-03-12T03:58:57+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे़ शिवसेनेने तर मनसेला आग लावणारे संबोधले आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

If we are not going to set a fire, then we are going to rest - Uddhav Thackeray | आम्ही आग लावणारे नाही तर विझविणारे आहोत - उद्धव ठाकरे

आम्ही आग लावणारे नाही तर विझविणारे आहोत - उद्धव ठाकरे

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे़ शिवसेनेने तर मनसेला आग लावणारे संबोधले आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आम्ही आग विझविणारे आहोत़ हा आग विझवणाऱ्यांचा कार्यक्रम आहे, असा टोला मनसेला आज एका कार्यक्रमातून लगावला़
मुंबई अग्निशमन दलाच्या विक्रोळी प्रादेशिक केंद्राचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले़ यावेळी नवीन परवाने दिलेल्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास जाळा, असे वादग्रस्त वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.
याबाबत विचारले असता, आम्ही आगी विझवितो़ हा कार्यक्रम आग विझविणाऱ्यांचा आहे़ आगी विझविण्याच्या कार्यक्रमात मी आलो आहे, असा टोला त्यांनी
लगावला़सीमारेषेवर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मात्र संरक्षण देण्यात येते, यावर प्रतिक्रिया देताना अतिरेकी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर संबंध ठेवू नका.़ देशातून एकमुखी आवाज उमटत नाही, तोपर्यंत पाकचे चाळे सुरूच राहणाऱ मतांचे राजकारण करताना आपण देशाचा घात तर करीत नाही ना, याचा ज्याने त्याने विचार करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली़ (प्रतिनिधी)

Web Title: If we are not going to set a fire, then we are going to rest - Uddhav Thackeray