शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"...तरच मी सल्ला मानला असता", प्रकाश आंबेडकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; युतीत ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 12:52 IST

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपूर वापरायला हवेत असा सल्ला दिला. आता राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सांभाळून बोला हे मला ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे शिवशक्ती-भिमशक्ती युतीला चारच दिवस झालेले असताना युतीत ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"देशात कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कोणताही भारतीय एकमेकांचा शत्रु होऊ शकत नाही. दोन राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण शत्रुत्व अजिबात नाही. मनुस्मृतीच्या मुद्द्यावरुन आमचे भाजपासोबत टोकाचे मतभेद आहेत आणि ते राहतील. जर भाजपानं मनुस्मृतीची विचारधारा सोडण्याचा निर्णय घेतला तर आमचेही मतभेद टळतील", असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे", असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला. 

संजय राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. "मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असं सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

...तर भाजपासोबतही एकत्र बसायला तयार"कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु नाहीत. जे जे राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, मतदार आहेत ते भारतीय आहेत आणि भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकचे मतभेद असू शकतात. भाजपा आणि आरएसएस सोबत आमचे टोकाचे मतभेत आहेत. ते अनेकवेळा मांडलेले आहेत. आरएसएस आजही मनुस्मृतीला मानेत आणि आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत राहून राज्य करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र बसायला तयार आहोत. मनुस्मृती कुठलाही धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा तो ग्रंथ आहे. हे जर बदलणार असेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम होणार असेल तर आम्ही एकत्र बसायला तयार आहोत", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊत