माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी सोबत राहू नये - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: January 23, 2017 23:10 IST2017-01-23T21:22:04+5:302017-01-23T23:10:20+5:30

षण्मुखानंद येथे आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑडिओ बुकचं अनावरण करण्यात आलं आहे.

If they do not believe in my leadership they should not stay together - Uddhav Thackeray | माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी सोबत राहू नये - उद्धव ठाकरे

माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी सोबत राहू नये - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - षण्मुखानंद येथे आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते 'शिवसेना: 50 वर्षांची घोडदौड' ऑडिओ बुकचं अनावरण करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी पक्षातील असंतुष्टांनाही खडे बोल सुनावले आहेत. ज्यांचा माझ्या नेतृत्वावर, शिवसेनेवर विश्वास नसेल त्यांनी पुढे निघून जावं, त्यांनी माझ्यासोबत राहू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखांवर भाष्य केलं आहे. सामना हे एक शस्त्र आहे, असं बाळासाहेब ठाकरे नेहमीच बोलायचे, हातात बंदूक नसली तरी सामना हे शस्त्र असल्याचं शिवसैनिकांनी कायम लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले आहेत. जोपर्यंत युतीसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत शांत राहिलेलं बरं, युतीसंदर्भात सविस्तर 26 जानेवारीला बोलेन, पुढच्या महिन्यात 23 तारखेलाही याच उत्साहात भेटू. मराठी माणसानं एकजुटीनं राहिलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी सेना-भाजपा युतीवर बोलण्याचं टाळलं आहे. 

Web Title: If they do not believe in my leadership they should not stay together - Uddhav Thackeray