पुढच्या आठवडयात बँकेची काम असतील, तर चालढकल करु नका! अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:05 IST2017-09-23T14:58:06+5:302017-09-23T15:05:46+5:30
पुढच्या आठवडयात बँकेचे व्यवहार वेळेत करणे ग्राहकांच्या फायद्याचे असेल. आजचे काम उद्यावर ढकलले तर ग्राहकांची गैससोय होऊ शकते.

पुढच्या आठवडयात बँकेची काम असतील, तर चालढकल करु नका! अन्यथा...
मुंबई, दि. 23 - पुढच्या आठवडयात बँकेचे व्यवहार वेळेत करणे ग्राहकांच्या फायद्याचे असेल. आजचे काम उद्यावर ढकलले तर ग्राहकांची गैससोय होऊ शकते. कारण पुढच्या आठवडयात सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेच व्यवहार करताना चालढकल करु नका. अन्यथा सणाच्या दिवशी बँक खात्यात पैसे असूनही तुम्ही अडचणीत येऊ शकता.
पुढच्या आठवडयात 30 सप्टेंबरला शनिवारी दस-या निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 1 ऑक्टोंबर रविवार आहे तर, 2 ऑक्टोंबरला सर्वत्र गांधी जयंतीची सुट्टी असेल. त्यामुळे सलग तीन दिवस तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.
आता सर्वच बँकांच्या बहुसंख्य खातेदारांकडे एटीएम कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. पण सर्वच बँका बंद असल्याने कॅशसाठी ग्राहक एटीएमचा वापर करतील. अशावेळी कदाचित जवळच्या एटीएममध्ये कॅश संपल्यामुळे तुम्हाला पायपीट करावी लागू शकते. त्यामुळे येत्या आठवडयात बँकेचे सर्व व्यवहार वेळीच मार्गी लावणे ग्राहकाच्या फायद्याचे आहे.