शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:20 IST

हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मागेही बोललो होतो आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई - महाविकास आघाडीत कुणी कुठल्या जागा लढवायच्या हे ठरवण्याची गरज आहे. तशी वेळ आली आहे. ते ठरवल्यानंतर मित्रपक्षांना जागा देण्याचं ठरेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. नागपूरमध्ये आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराला सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला. अमरावती काँग्रेसनं आमचा माणूस उमेदवार म्हणून उभा केला. त्यामुळे सामंजस्याचं राजकारण यापुढे करायचं नसेल तर कुणी एकत्र येण्याचं नाटक करू नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला आहे. 

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युती आज घोषणा करण्यात आली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे ३ वर्षापूर्वी शरद पवारांसोबत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे. जेव्हा फसवणुकीचं राजकारण होतंय हे लक्षात आले तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो. जवळपास अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार यशस्वी चालवलं. हेतू चांगला असेल तर पुढील गोष्टी व्यवस्थित होतात. प्रकाश आंबेडकरांसोबत आमच्या बैठका झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा झालीय. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येण्यास कुणाची हरकत नाही. मविआत प्रत्येकाने आपापल्या मित्रपक्षाचं हित सांभाळायचं हे ठरले आहे. देश प्रथम हा सामायिक हेतू आहे. त्या हेतूला तडा जाणार नाही. मविआचे घटक पक्ष म्हणून वंचितने वाटचाल करण्यास काही हरकत नाही असं त्यांनी सांगितले. 

हिंमत असेल तर निवडणूक घ्या हिंमत असेल तर निवडणुका घ्या, आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात. जागावाटपाचा विचार केल्याशिवाय आम्ही एकत्रित आलो नाही. गद्दार आणि त्यांच्या राजकीय बापजाद्यांना आव्हान आहे लवकरात लवकर निवडणुका घ्या असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपा-शिंदे गटाला दिले आहे. तर आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे माझ्या वडिलांनी सांगितले. त्याच मार्गावर आम्ही पुढे वाटचाल करतोय. आमच्या आजोबांनी चुकीच्या प्रथांना विरोध केला. हिंदुत्व हा आमचा श्वास, राष्ट्रीयत्व आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे त्यामुळे आमची युती योग्य दिशेने वाटचाल करेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर