शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Tanushree Datta Controversy: याद राखा, तनुश्री दत्ताला प्रवेश दिला तर... मनसेची 'बिग बॉस'ला तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 19:41 IST

अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून टाकण्याचा इशारा दिला. 

पुणे :  अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून टाकण्याचा इशारा दिला. 

            याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची हवी होती. ती त्यांना मिळाली नाही म्हणून ते गुंडगिरी करत आहेत, असे विधान केले होते. या विधानानंतर त्या चांगल्याच वादात सापडल्या असून त्यांच्यावर मनसैनिकांनी आक्षेप नोंदवला आहे. मंगळवारी याचाच भाग म्हणून लोणावळा येथील मनसे विद्यार्थी सेनेने बिग बॉस कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन दत्ता यांना प्रवेश दिला तर स्टेज उखडून टाकू असा इशारा दिला.दत्ता जर या कार्यक्रमात सहभाग होणार असतील तर  त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कलर्स वाहिनीची असेल असे पत्रही बिग बॉस व्यवस्थापन देण्यात आले.  

          यावेळी मनविसे लोणावळा शहराध्यक्ष अक्षय जाचक, अविनाश जांभुळकर, विजय भानूसघरे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता गुजर, संतोष शिंत्रे, सरपंच संतोष खराडे, सागर शेरकर, सुमित उके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :Tanushree Duttaतनुश्री दत्ताlonavalaलोणावळाBigg Boss 12बिग बॉस 12Raj Thackerayराज ठाकरे