शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

रात्री कुणी गेलं की काळजात होतं धस्स!

By admin | Updated: August 5, 2016 23:45 IST

कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स होतंय.

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 5 -  कृष्णेच्या पुराने माहुलीच्या कैलास स्मशानभूमीत भलताच पेच निर्माण केला असून, रात्री कुणी अकस्मात गेलं तर संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स् होतंय. कारण सकाळ होईपर्यंत नातलगाचा मृतदेह घरातच ठेवण्याची पाळी या पुरानं आणलीय.महाबळेश्वर, वाई तालुक्यांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढत होत आहे. त्यामुळे माहुलीतील कैलास स्मशानभूमीत पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याने रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर पर्याय म्हणून मृतदेह रात्रभर शीतपेटीत ठेवण्याचा पर्याय दिला आहे.कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीचा काही भाग पाण्याखाली गेला होता. पाणी कमी झाले असले तरी पाणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यापुढे रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही त्या-त्या दिवसाच्या पाणी पातळीनुसार रात्री स्मशानभूमी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिली आहे. कैलास स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी १४ अग्निकुंड आहेत. त्यापैकी आठ नदीपात्रालगत तर सहा बंदिस्त आहेत. नदीला पाणी वाढल्याने आठही अग्निकुंड पाण्याखाली जातात. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे. रात्री स्मशानभूमी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मृतदेह ठेवण्यासाठी शहरात दोन ठिकाणी शव शीतपेटी भाडेतत्त्वावर उपलब्ध असल्याची माहिती मृताच्या नातेवाइकांना दिली जात आहे. रात्री चिता अर्धवटच जळाली.. अखेर सकाळी विधी दोन दिवसांपूर्वी माहुलीच्या स्मशानभूमीत रात्री दहा वाजता एका कुटुंबाने चिता पेटविली. आगीच्या ज्वाळा धडाडल्यानंतर नातेवाईक घरी गेले. मात्र, नंतरच्या तुफान पावसामुळे चिता अर्धवटच जळाली. तेव्हा, स्मशानभूमीतील संबंधित कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांशी मोबाइलवरुन संपर्क साधला. मात्र, अशा प्रचंड पावसात मध्यरात्री येणे शक्य नसल्याने नातेवाईक सकाळीच स्मशानभूमीत आले. पुन्हा एकदा सर्व विधी पार पाडून ही चिता पेटविण्यात आली. हा कटू अनुभव ध्यानात घेऊनच पूर ओसरेपर्यंत रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत अंत्यसंस्कार थांबवण्याचा निर्णय स्मशानभूमी व्यवस्थापनाने घेतलाय. गेल्या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत पावसामुळे रात्रीचे अंत्यसंस्कार स्थगित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.संततधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होत आहे. अंत्यविधी व्यवस्थित होण्यासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत धोम आणि कऱ्हेर धरणांतील अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन रात्री उपलब्ध अग्निकुंडात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. - राजेंद्र चोरगे, संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट