"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 20:54 IST2025-04-21T20:53:26+5:302025-04-21T20:54:54+5:30

"जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू..."

If Raj Thackeray and Uddhav Thackeray form an alliance, sugar will be distributed on elephants Thackeray group leader Sharad Koli determination | "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार

"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत येण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर अशा चर्चा यापूर्वीही अनेक वेळा झाल्या आहेत. दरम्यान, जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भात बोलताना कोळी म्हणाले, "खरे तर, एक शिवसैनिक म्हणून, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत. जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू. खरे तर, दिल्लीश्वराच्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळला आहे. हे सुडाचे राजकारण याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही त्याची वाट बघत आहोत." कोळी एबीपी माझासोबत बोलत होते.

कोळी पुढे म्हणाले, "चांगली गोष्ट होत असतानाच, काही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी, दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी भान ठेवायला हवे. काल परवाच मनसेचे संदीप देशपांडे उद्धव साहेबांसंदर्भात काही बोलले. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, संदीपजी उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका. आपली तेवढी क्षमता नाही." एवढेच नाही तर, "उद्धव साहेब आणि राज साहेब निर्णय घ्यायला मजबूत आहेत. त्यांचा निर्णय शिवसेना आणि मनसैनिकांसाठी अंतिम आहे. युती झाल्यानंतर आपण एकत्रितपणे काम करून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थाप करून गद्दारांना आणि दिल्लीश्वराला याच  महाराष्ट्रात गाडूया," असेही कोळी म्हणाले.

 

Web Title: If Raj Thackeray and Uddhav Thackeray form an alliance, sugar will be distributed on elephants Thackeray group leader Sharad Koli determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.