शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नाही तर शिवसेनेलाही नको, रायगड जिल्हा भाजप मंत्र्याकडे द्या; NCP ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:00 IST

पालकमंत्रिपदावरून महायुतीत जुंपली, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली

दीपक भातुसे मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून रायगडचे पालकमंत्रिपद चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावरून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. यावर तोडगा म्हणून रायगडचे पालकमंत्रिपद शिंदे गटालाही नको आणि राष्ट्रवादीलाही नको, तर भाजपने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.  

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरेंनी हे पद भूषवले होते. मात्र या चर्चेमुळे शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची अस्वस्थता वाढली. त्यातूनच त्यांनी उघडपणे रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी केली आणि आदिती तटकरे महिला असल्याने त्यांच्यापेक्षा आपण चांगले काम करू शकू, असा अजब दावाही केला.  गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करण्यास अजित पवार गटाचा तीव्र विरोध असेल. राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद द्यायचे नसेल तर ते शिंदे गटालाही देऊ नये, त्याऐवजी भाजपने रायगडचे पालकमंत्रिपद घ्यावे, अशी मागणी पवार गटाने समोर ठेवल्याचे समजते.   

उदय सामंतांचे काय होणार?सध्या उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद आहे. अजित पवार गटाकडून होणारी मागणी मान्य झाली तर सामंत यांना रायगडचे पालकमंत्रिपद गमवावे लागेल. त्याऐवजी त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी द्यावी लागेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा