शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:29 IST

गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

कल्याण :  गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.  कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते काल (दि.21) करण्यात आले आहे.

राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे केली जात आहे.  2022 पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रस्ते तयार करणाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडे त्याच्या दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे. तीन ते पाच वर्षाचे दायित्व दिले जाईल. रस्ता विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्त्यावर खड्डा पडला. रस्ता खराब झाला तर संबंधित कंपनीकडून त्यांची दुरुस्ती देखभाल करणे व बुजविण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.मंत्री येणार असेल तर सरकारी यंत्रणा कामाला लागते. रस्ते तयार केले जातात. रस्ता तयार करण्याची सूचना नसेल तरी रस्ता तयार केला जातो. हावरे यांनी सांगितल्याप्रमाणे कल्याण पडघा रोडपासून हावरे यांच्या गृह प्रकल्पात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा अरुंद रस्ता तयार केला. हा रस्ता हावरे प्रकल्पासाठी केला गेला असला तरी त्याच रस्त्यावरुन पाटील प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठीच हा रस्ता तयार केला. मंत्री असण्याचे फायदे असतात. रस्ता तयार होतो असेही वक्तव्य पाटील यांनी येथे केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkalyanकल्याण