‘जेईई’त कल्पित देशात तर नाशिकची वृंदा मुलींमध्ये प्रथम

By Admin | Updated: April 28, 2017 03:04 IST2017-04-28T03:04:01+5:302017-04-28T03:04:01+5:30

देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण

If JEE is a legendary country, then the first of the Vradi girls of Nashik | ‘जेईई’त कल्पित देशात तर नाशिकची वृंदा मुलींमध्ये प्रथम

‘जेईई’त कल्पित देशात तर नाशिकची वृंदा मुलींमध्ये प्रथम

नवी दिल्ली/नाशिक : देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या ‘जेईई-मेन-२०१७’ या परीक्षेत ३६० पैकी ३६० गुण मिळवून उदयपूरचा कल्पित वीरवाल संपूर्ण देशात पहिला आला तर मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी हिने मिळविला. ३२१ गुण मिळविणारी वृंदा गुणानुक्रमे देशात ७१ वी ठरली.
गेल्या ५८ वर्षांत आयआयटीच्या या अत्यंत कठीण अशा प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील एकही मुलगी देशात पहिली आली नव्हती. ते वृंदाने करून दाखविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपूर्ण देशात विष्णू जैन व अनन्ये अगरवाल हे परीक्षार्थी अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. या दोघांनाही प्रत्येकी ३५० गुण मिळाले. प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्याची ही पहिली पायरी आहे. यानंतर ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ ही अंतिम परीक्षा होईल व त्यातील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होतील. सीबीएसईने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ‘जेईई-मेन’ परीक्षेला बसलेल्या एकूण ११ लाख ८६ हजार ४५४ विद्यार्थ्यांपैकी दोन लाख २१ हजार ४२७ ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’साठी पात्र ठरले. यात १.७५ लाख मुले तर ४६,१६० मुली आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा २१ मे रोजी व्हायची आहे. यातून अंतिमत: १३ हजारजागांवर प्रवेश दिले जातील.
देशात पहिल्या आलेल्या कल्पितचे वडील पुष्करलाल हे सरकारी इस्पितळात कम्पाऊंडर आहेत तर त्याची आई शाळेत शिक्षिका आहे. कल्पितने ही परीक्षा डोळ््यापुढे ठेवून इयत्ता आठवीपासूनच खासगी क्लास लावला होता. अजून नक्की ठरविले नसले तरी मुंबई आयआयटीत कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविण्याची त्याची इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

वृंदाला करायचंय संशोधन-
वृंदा राठी नाशिकच्या सेंट झेवियर्स हायस्कूलची असून तिने शालान्त परीक्षेत ९४ टक्के गुण मिळविले होते. जेईईसाठी क्लास लावला होता. आयआयटीमधून संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची तिचा इच्छा आहे. वृंदाचे वडील प्रॉडक्शन इंजिनीअर असून सिन्नर येथे त्यांचा लघुउद्योग आहे. तिची आई कृष्णा आर्किटेक्ट आहे.
वृंदाच्या यशामुळे आमची मान उंचावली. पहिल्या शंभरमध्ये येईल, असे वाटले होते. पण तिने त्याहूनही उत्तुंग भरारी मारली. याचा नाशिककरांनाही अभिमान आहे. - नंदकुमार राठी, 
वृंदाचे वडील

Web Title: If JEE is a legendary country, then the first of the Vradi girls of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.