शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'निवडणुका लागल्यास एकत्र येऊ'; प्रकाश आंबेडकर- उद्धव ठाकरेंमध्ये १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 22:23 IST

Prakash Ambedkar talk on Uddhav Thackeray alliance: प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली.

आम्ही एकत्र कधी येणार हे निवडणुका कधी लागतील त्यावर अवलंबून आहे. आता लागल्या तर ताबडतोब. नंतर लागल्या तर नंतर, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. तर कार्यक्रमात वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला

कार्यक्रमापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे टीव्ही ९ ला सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे-आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू काही दिवसांपूर्वीच आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु होती. यावर आज आंबेडकर यांनी पडदा टाकला. 

वेबसाईटच्या अनावरण प्रसंगी आंबेडकर म्हणाले की, 700 वर्षांपूर्वी वारी सुरु झाली ती सुद्धा एक बंड आहे. संतांनी संगितलेले की आम्ही वेगळ्या पद्धतीने राहणार. यासाठी केलेली ही एक व्यवस्था होती. धर्माने सांगितलेली आणि संतांनी सांगितलेली आणि वैदिक धर्माने सांगितलेली सामाजिक व्यवस्था याचा टकराव झाल्याने भांडणे होत असतात, असे ते म्हणाले. 

सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही मांडलेला नाही. तुम्ही त्याला बंदिस्त करु शकत नाही. कारण पिढी जशी बदलली जाते तसे सर्वच बदलत जाते. आपले विरोधक आहेत ते लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. लोकशाही पाहिजे की हुकूमशाही पाहिजे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. प्रत्येक मतदार स्वतःचे मत ठरवत नाही. तोपर्यंत इथे असलेली व्यवस्था शांततेने जगू देईल असे वाटत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही दोघांचे नातू इथे बोलत आहोत. काही आजोबा बोलत आहेत. मग वाट दाखविणाऱ्यांना आदर्श मानायचे की वाट लावणाऱ्यांना मानायचे, हा प्रश्न पडला आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नाव न घेता लगावला. घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी