शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:57 PM

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली – छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आमचं प्रेम आहे. आम्ही त्यांच्याशी कायम संपर्कात असतो. परंतु निवडणूक ही वेगळी असते. निवडणुकीत कोण कोणत्या भूमिका घेऊन उभं राहतो त्याकडे पाहिले जाते. संसदेत त्यांना बोलू दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी राहिलो त्यामुळे छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनाराज्यसभा निवडणुकीत २ जागा लढवणार आहे. लोकशाहीने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला आहे. तसेच निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यावर प्रेम आहे. पण निवडणुकीत कोणत्या भूमिका घेऊन उभे राहतात याकडे पाहिले जाते. छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता. मराठा आरक्षणावर त्यांना संसदेत बोलून दिले नाही तेव्हा मी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभा राहिलो होतो असंही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या कोर्टात चेंडू ढकलला

राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे १ जागा असताना शिवसेनेने मोठे मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती. तेव्हा शरद पवारांनी(Sharad Pawar) पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला २ जागा देण्याचं कबूल केले होते. अलीकडेच शरद पवार, उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांची बैठक झाली आहे. त्यात याबाबत चर्चा झाली असावी. कुणी किती जागा लढवायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. १० सूचक जे आणतील ते जागा लढवू शकतात. संभाजीराजेंना(Chhatrapati Sambhajiraje)  पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांशी कुठलेही चर्चा झाली नाही. सर्वोच्च नेते बोलतील असंही त्यांनी सांगितले.

तर शरद पवारांनी मात्र राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अतिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRajya Sabhaराज्यसभा