शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्या एखादी घटना घडली तर...; सुरक्षेत घट केल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:37 IST

२०-२५ वर्ष आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांची सुरक्षा काढणे त्याला राजकीय रंग आहे असं वाटतं. अशी सुरक्षा काढून घेणे योग्य नाही असंही सतेज पाटील यांनी म्हटलं. 

कोल्हापूर - राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या जर एखादी घटना घडली तर त्याला गृहमंत्रालय जबाबदार राहील अशा शब्दात काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

सतेज पाटील म्हणाले की, राज्य गुप्तचर यंत्रणा हे धमकींचा आढावा घेते. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्याचा निर्णय घेते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आलीय. या नेत्यांची सुरक्षा कमी करणे संशयास्पद वाटते. या नेत्यांच्या जीवाला धोका नाही हे रेकॉर्डवर आहे का? हे पाहावं लागेल. जर उद्या एखादी घटना घडली तर त्याला गृहखाते जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत निर्णय प्रक्रियेत या मंडळींनी काही निर्णय घेतलेले असतात जे काहींना आवडले नसतात. पण सुरक्षा व्यवस्था ही दाखवण्यासाठी नसते. निर्णय घेतल्यानंतर त्रुटी असतात, त्यासाठी सुरक्षा पुरवली जाते. माझ्या वैयक्तिक बाबतीत सुरक्षा काढण्याबाबत हरकत नाही. परंतु जी नावे पुढे येतात त्यांनी २०-२५ वर्ष आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांची सुरक्षा काढणे त्याला राजकीय रंग आहे असं वाटतं. अशी सुरक्षा काढून घेणे योग्य नाही असंही सतेज पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, सुरक्षा कोणाला कशी द्यायची याबाबत हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे संशयास्पद भूमिका वाटते. नार्वेकरांना धमकी जास्त असेल किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली असावी. नियमाने त्यांची सुरक्षा वाढवली आहे का हे अभ्यास करणे गरजेचे आहे. सुरक्षेची मागणी करण्याची आवश्यकता नाही. गृहखात्याची ही जबाबदारी आहे. राज्यातील सुरक्षा राखणं ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे जो काही निर्णय घेतला असेल त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार