शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 09:42 IST

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारामतीसह राज्यात मोदी विरुद्ध गांधी, असा सामना असल्याचा दावा भाजपचे नेते करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र पवार विरुद्ध पवार, अशी लढत लावून शरद पवार यांचे राजकारण संपवण्याचा डाव भाजप खेळत आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उभे करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत केला. 

बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. सोबतच इंदापूरचे दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, दौंडचे राहुल कुल आणि थोरात यांची याआधीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मदत झाली होती; पण यावेळी हे सर्व विरोधात आहेत. यामागे शरद पवार यांना संपवायचे हेच एकमेव कारण असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीच जाहीर केलेय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी हा भाजपच्या षड्यंत्राचा भाग आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. 

पवारांमध्ये भांडण नसून वैचारिक लढाई सुरू आहे आणि जे काही पवारांमध्ये घडलंय ते एक राजकीय षड् यंत्र आहे. त्यामुळेच अजित पवार आणि आपलं राजकारण हे पूर्णपणे वेगळं झालंय. पुढंही ते तसंच राहील. राहिला प्रश्न शरद पवारांचा, तर ते संपणार नाहीत, असा दावादेखील त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांचे आमदार व इतर नेते महायुतीकडे आहेत. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघातील जनसंपर्क, संसदीय कामकाजातील सहभाग आणि कामगिरी, तसेच आपल्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाच डाग नसल्यामुळे लोकांची मते मिळवण्यात अडचण येणार नाही.

खुद्द अजित पवार उभे असते, तर... अजित पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं आणि सुप्रिया सुळेंनी दिल्लीतलं राजकारण पाहायचं हे कुटुंबात ठरलं होतं. अजित पवारांना दिल्लीला जाण्यात कधीच रस नव्हता, तसेच सुनेत्रा वहिनी राजकारणात कधीच नव्हत्या. त्यामुळे त्या निवडणूक लढवतील, असा विचार केला नव्हता. त्यांनी कधी राजकारणात यायची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांना निवडणुकीत उभं केलं गेलं. या निवडणुकीत खुद्द अजित पवार समोर उभे असते, तर आनंद वाटला असता, असेही सुळे म्हणाल्या. 

कुटुंबात भांडण नाही, वैचारिक लढाई   पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे. निवडणुकीत विरोधात घरातील सदस्यच समोर उभा असल्याचे चित्र असले तरी पवार कुटुंबात भांडणे नसून, ही वैचारिक लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या. दिल्लीतील नेत्यांना एक मराठी माणूस हा गल्ली ते दिल्ली त्यांच्याविरोधात लढतोय, हे सहन होत नाही. ते त्यांच्यासोबत जात नाहीत, झुकत नाहीत, म्हणून शरद पवारांना संपवण्याचे हे षड्यंत्र सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीमध्ये भाजपकडे तगडा उमेदवार नसल्यामुळेच घर फोडा, पवारांचे खच्चीकरण करा, असे प्रयत्न केले गेलेत. प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांच्याऐवजी अजित पवार हेच स्वतः उमेदवार असल्याचे सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार